सात प्रयत्नानंतर आले यश, जयेश झाला भारतीय लष्करात लेफ्टनंट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अपयशावर मात करत सातत्याने प्रयत्न करणाºयांसाठी जयेश क्षीरसागर यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे. भंडारा येथील जयेश यांनी भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर साकार केले. आॅफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडनंतर त्यांना ‘लेफ्टनंट’ पद बहाल करण्यात आले. जयेश यांचे शालेय शिक्षण लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथे झाले. त्यांनी नागपूर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवून त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. अधिकारी होण्यासाठीच्या कठीण प्रक्रियेत सुरुवातीचे सहा प्रयत्न अपयशी ठरले. मात्र त्यांनी हार न मानता सातत्य कायम ठेवले. अखेर सातव्या प्रयत्नात त्यांनी यश संपादन करत आपल्या ध्येयाला गवसणी घातली. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पासिंग आऊट परेडला उपस्थित असलेल्या आई-वडिलांनी अभिमान व्यक्त केला. जयेश यांनी देशसेवा हीच सर्वोच्च प्रेरणा असल्याचे सांगत प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

अपयशातून उभारी

सहा वेळा अपयश आल्यानंतरही जयेश यांनी खचून न जाता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या चिकाटीमुळेच सातव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

युवकांसाठी आदर्श

जयेश क्षीरसागर यांची कहाणी युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, संयम आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवल्यास यश निश्चित मिळते, हा संदेश त्यांच्या यशातून मिळतो.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *