
अभिमन ठाकरे /भंडारा पत्रिका लाखांदूर : भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी कर्जपायी आत्महत्या केली. त्यात लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील मुन्ना/मुनेश्वर बगमारे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तिन चार वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. त्यातूनच कर्जबाजारीपणामुळे व मानसिक तणावातून शेतकºयाच्या आत्महत्या होत आहेत . यासाठी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी शेतकºयाची कर्जमाफी व शेतकरी आत्महत्येचा प्रश्न विधान सभेत उपस्थितीत केला. लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील रहिवासी मुन्ना/मुनेश्वर वगनजी बगमारे यांनी २३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शेतशिवरात जाऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तिन चार वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे या कुटुंबावर आधीपासूनच आर्थिक संकट निर्माण झाले होते.
कर्जबाजारीपणामुळे आणि वाढता मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचललेल्याच्या समोर येत आहे. सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी त्या सोबत अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. राज्यात दररोज चार पाच शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर दिसून येत आहेत. शेतकºयाच्या कर्ज माफीबाबत सरकारने स्पष्टात आणली तर राज्यातील शेतकºयाच्या आत्महत्या केल्याची वाढ होणार नाही. मन्ना/मुनेश्वर वगनजी बगमारे यांनी अवघ्या ४७ वर्षांचा तरुण शेतकºयाच्या आत्महत्या होत असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणूनच राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच सभागृहात मांडलेला प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.