धान्य साखर वाटप न करणाºया रेशन दुकानदारांवर कारवाई होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथे राशन वितरण व्यवस्थेबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, शहरातील काही रेशन वितरकांकडून कार्डधारकांची दिवसाढवळ्या फसवणूक होत असल्याची तक्रार पुढे आली होती. बºयाच शिधापत्रिकाधारकाला मिळणाºया धान्यातून कमी धान्य दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली होती. या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार उपेश अंबादे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने तहसीलदारानी तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश पुरवठा अधिकाºयांना दिले होते. या चौकशीत रेशन कार्ड धारकांना धान्य, साखर वाटप न करणे, पावती न देणे, रेकॉर्ड अद्यावयत न ठेवणे आदी कारणांवरून रेशन दुकानात अनियमितता आढळून आली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार अनिल साकुरे यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याबाबत तहसीलदार उपेश अंबादे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेशवंजारी यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केले. यामुळे रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *