मॉयल लिमिटेड च्या विरोधात सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन प्रदीप पडोळे यांच्या प्रयत्नाने मागे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मॉयल लिमिटेडच्या अनुकंपा विषयी घेण्यात आलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि अन्य मागण्यांना घेऊन सुरू असलेल्या तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील सरपंच प्रकाश धीकोडी हे दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण वर बसले होते. या उपोषणाची दखल घेत तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी.प्रदीप पडोळे यांनी दोन दिवसा अगोदर भेट देऊन मॉयल कर्मचाºयांचा विषय मार्गी लावून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद सदस्य डॉ. परिणयजी फुके यांच्याशी लगेच चर्चा करून त्यांच्या माध्यमातून मॉयलचे नागपूर येथील अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती.

नोकरीत कार्यरत असताना कामगार किंवा कर्मचाºयांचा मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती नोकरी दिली जाते ही अनुकंपा पद्धत बंद करण्याचा निर्णय मॉयल प्रशासनाने घेतला. यासोबतच काही कंत्राटी पद्धतीने कामगारांना कमीत कमी वेतन सुद्धा देण्यात येत नसल्याने कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करावी व मॉईल प्रशासनाच्या अन्य धोरणांच्या मागण्या जाणून घेतल्या. अनुकंपा पद्धत बंद करणे अन्याय आहे. आज अनेक कामगार काम करीत असताना विविध दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना संधी देणे गरजेचे आहे पण प्रशासन या बाबत सकारात्मक नाही. अनुकंपा देताना ६ लाख वार्षिक उत्पनाची अट टाकण्यात आली आहे. ती योग्य नाही. अशा अनेक मागण्या यावेळी आमरण उपोषण च्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ ला नागपूर येथील मॉयल प्रशासनचे अधिकारी स्थानिक मॉयल अधिकारी, तुमसरचे एसडीएम श्री.अंबादे, पोलीस प्रशासन, आज आंदोलन स्थळी उपस्थित झाले. या दरम्यान आंदोलकर्त्यांशी बोलून पडोळे यांनी मॉयल प्रशासनातील अधिकाºयांशी चर्चा केली. मागण्यांच्या दृष्टीने सकारात्मक तोडगा काढावा याबाबत चर्चा करण्यात आली.

या दरम्यान मॉयल अधिकारी यांच्या वतीने सर्व मागण्या वरच्या अधिकारी वर्गाशी उच्च स्तरीय बैठक घेऊन सर्व प्रकारच्या मागण्या केंद्र सरकार कडे पाठवून मान्य करण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन प्रदीप पडोळे यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी उपोषण करत असलेले सरपंच प्रकाश धिकोडी यांना पडोळे यांनी उपोषण मागे घेण्याकरिता तयार केले. दरम्यान त्यांच्या व मॉयल चे अधिकारी यांच्या हस्ते धिकोडी यांना ज्यूस पाजून उपोषण समाप्त करण्यात आले. उपोषण स्थळी नगरपरिषद तुमसर चे उपाध्यक्ष सचिन बोपचे, मुन्नाजी पुंडे, आंनदजी जैस्वाल, संतोष वहिले, रुपाजी सोनवाणे, श्यामजी बिसने, अरुण बोपचे, शकील शेख, डॉ.अरुण झोडेजी उपसरपंच नदीमजी पाशा, अजय झंझाड, राजा मरस्कोले प्रफुल्लजी गुप्ता यांच्या सह उपोषणाला समर्थन करणारे इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सरपंच धिकोडी यांनी सर्व विषयावर मार्ग काढून देण्यासाठी परीणय फुके, प्रदीप पडोळे व भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे व समर्थन करत असलेल्या समर्थकांचे आभार मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *