भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहर चकाचक ठेवणाºया नगर परिषद तुमसर येथील कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, गेल्या आठ दिवसापासून सफाई कामगार संपावर असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, किमान वेतन कायदा लागू करावा आणि चा लाभ द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना एक जाहीर इशारा निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी नगरसेविका रोशनी भोंडेकर, रेखा चकोले, एढऋड-एरकउ नगरसेवक गुलराज कुंदवाणी प्रामुख्याने उपस्थित होते. सफाई कामगारांचे मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषदेसमोर १० जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. तुमसर नगर परिषदेअंतर्गत सध्या ६० कंत्राटी सफाई कामगार जीवाची पर्वा न करता शहराच्या स्वच्छतेचे काम पाहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून आणि कंत्राटदाराकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असूनही कामगारांना रेनकोट, गमबूट, हातमोजे, मास्क किंवा ओळखपत्र यांसारखे कोणतेही सुरक्षा साहित्य पुरविण्यातआलेले नाही. यामुळे कामगारांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.