नागपूरच्या ५ फरार गुन्हेगारांना धनेगाव येथे अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा: पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या धनेगाव येथे एमआयडीसी नागपूरचे ५ फरार अट्टल गुन्हेगार दडून असल्याची माहिती ग्रामवासियांनी १६ फेब्रुवारी रोजी सिहोरा पोलिसांना दिली होती.पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी दखल घेत सापळा रचला व दडून असलेल्या पाचही फरार आरोपींना धनेगाव येथून अटक केले. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे नागपूर मधील हाफ मर्डर आणि गंभीर मारहाणीच्यागुन्ह्यातील असून नागपूर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे करून फरार झालेले आरोपी असल्याचे उल्लेखित आहे. सविस्तर वृत्त १६ फेब्रुवारी रोजी सिहोरा पोलिसांना ग्रामवासियांनी दिलेल्या माहितीनुसार धनेगाव परिसरात पाच अनोळखी तरुण संशयास्पद रित्या वावरत आहेत.

या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विजय कासोधान यांनी तातडीने पोलीस पथक तयार केले आणि धनेगाव येथुन पाचही तरुणांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत उडवा-उडविची उत्तरे दिल्यामुळे यांना पोलीसी खाक्या दाखविण्यात आला तेव्हा त्यांनी आपले खरे नाव कांचन उर्फ लहानभाऊ ठाकरे वय २२ रा. भीम नगर, नीलडोह, नागपूर,आदर्श उर्फ आदु गौतम बनसोड वय २२ रा. भीम नगर,नीलडोह, नागपूर,समीर रवींद्र गजभिये वय १८ रा. भीम नगर, नीलडोह, नागपूर,आदया उर्फ अमित गणेश भलावी वय २७ रा. भीम नगर, नागपूर व अभय अशोक पोंगडे वय २४ रा. भीम नगर, नीलडोह, नागपूर असुन यांना एमआयडीसी पोलिसांनी ‘वॉन्टेड’ घोषित केले होते.

हे पाचही आरोपी नागपूर मधील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असल्याने, सिहोरापोलिसांनी नागपूर एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली या आरोपींनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपुरात प्राणघातक हल्ला (हॉफ मर्डर) आणि गंभीर दुखापत करण्याचे दोन वेगवेगळे गुन्हे केले होते. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (इठर) कलम १०९ (१) (जुन्या कढउ ३०७ नुसार हत्या करण्याचा प्रयत्न),११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. १०७/२०२६) दाखल होता. या घटनेनंतर नागपूर पोलीस त्यांच्या मार्गावर असतांनाच ते सिहोरा परिसरात फरारी काढण्यासाठी आले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *