नवजीवन (सीबीएसई) मध्ये ‘ज्ञानरंग’ वार्षिकोत्सव उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), जमनापूर/ साकोली येथे तीन दिवसीय ‘ज्ञानरंग’ वार्षिकोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. एल. पी. नागपूरकर (संचालक झ्र एफहकउअ फाऊंडेशन) होते, तर उद्घाटन डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर (शारीरिक निर्देशक, राजीव गांधी महाविद्यालय, सडक/अजुर्नी) यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सौ. मनीषा चव्हाण (सहायक वनसंरक्षक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, साकोली) उपस्थित होत्या. संस्थेचे विश्वस्थ शामरावजी नवखरे व देवचंदजी करंजेकर, शाळा व्यवस्थापक श्री. विनोद किरपान, प्राचार्या सौ. भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी श्री. सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका सौ. वंदना घोडीचोर मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्या सौ. भारती व्यास यांनी मूल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. श्री. विनोद किरपान यांनी गेल्या १४ वर्षांपासून संस्था सर्वांगीण विकासासाठी सुविधा देत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. एल. पी. नागपूरकर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. उत्सवांतर्गत गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र व आर्ट-क्राफ्ट प्रदर्शनासह नृत्य, नक्कल, एकांकिका, गीतगायन, वेशभूषा, रांगोळी व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *