मादा बिबटास वाहनाची धडक

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : नागझिरा अभयारण्याचे चोरखमारा गेट समोरील एका रिसॉर्ट समोरील रस्त्यावर एक बिबट जखमी अवस्थेत आढळून आल्याने वन्यजीव विभागातर्फे सदर बिबट्याचे रेस्क्यू करून नागपूर येथील वन्यजीव बचाव केंद्र येथे उपचारा करता पाठवण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी नवेगाव नागझिरा अभयारण्याचे चोरखमारा गेट समोरील लव्ह इन रिसॉर्ट समोरील रस्त्यावर एक बिबट जखमी अवस्थेत असल्याने एखाद वाहनाने या बिबट्यास धडक दिली असावी अशी माहिती मिळाल्यावरून उमरझरी वनपरिक्षेत्र अधिकारी कु. एस. पी. टेभंरे वन्यजीव अभयारण्याचे कर्मचारी एसटीपीएफ व जलद बचाव दलासोबतघटनास्थळी पोहोचुन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघराज तुलावि यांनी या बिबटाची तपासणी करून सदर जखमी बिबट मादा असून या बिबटाचे कमरेमागचे भागास एखाद्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखम असल्याने बिबटास चालत येत नसल्याचे सांगितले यावरून या पथकाने सदर बिबट्यास रेस्क्यू करून उपचारा करता वन्यजीव बचाव केंद्र गोरेवाडा नागपूर येथे पाठवले असून बिबटास धडक देणारे वाहनाचा शोध घेत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *