बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांचा चिमुकला ठार!

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे आज ९ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला घरातून उचलून नेले, या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (४) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हियांश हा आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला.

मागील दोन महिन्यापासून तिरोडा तालुक्यात अनेक गावात बिबट व पट्टेदार वाघाचा वावर असून या वन्य प्राण्यांची हल्ल्यात अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून दीड महिन्यात बिबट्याने दोन बालकांचा जीव घेतला असून तिरोडा वन विभाग केवळ पिंजरे लावण्याचे सांगत असले तरी वन विभागातर्फे बिबट्याचा कुठलाही बंदोबस्त होत नसून रात्रीसह दिवसाही बिबट्याचा वावर असून याची माहिती देण्यास वन विभागाचे अधिकारी कर्मचाºयांना नागरिकांनी फोन केल्यास त्यांचे फोनही उचलत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष असून आज ही घटना घडूनही नागरिकांचे रोशास समोर गेल्यास अनुचित घटना घडण्याचे भीतीमुळे स्थानिक वन विभागाचे कोणीही अधिकारी वा कर्मचारी इकडे फिरकले नसून वरिष्ठ अधिकाºयांनी येऊन पोलीस अधिकारी व तहसीलदार यांचे माध्यमातून नागरिकांची समजुत काढून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी मृत बालकाचा मृतदेहावर शव विच्छेदन करण्याची संमती दिली.

मागील दोन ते अडीच महिने पासून तालुक्यातील सुकळी, पिंकेपार , बोदलकसा, रुस्तमपुर ,खडकी, डोंगरगाव, खमारी चिखली, चूरडी, निमगाव इंदोरा खुर्द सरांडी ईसापुर खोपडा, बयवाडा, खोडगाव, बोपेसर,लाखेगाव परिसरात रात्रीसह भर दिवसाही बीबट वा पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. सुकळी,निमगाव इंदोरा,रुस्तमपुर,खडकी,डोंगरगाव या परिसरात दोन ते तीन बिबट वावरत असल्याचा नागरिकांचा अंदाज असून मागील दीड महिन्यात बिबट्याने अनेक जनावरांचा फडशा पाडला असून २९ नोव्हेंबर रोजी इंदोरा खुर्द येथील नववर्षीय बालिका रुची, पारधी हिचा बळी घेणारे घटनास्थळी गावकºयांनी स्थानिक वन अधिकारी कर्मचाºयांना माहिती देऊनही कोणीही घटनास्थळी दीड ते दोन तास न पोहोचल्याने नागरिकात रोष व्यक्त करण्यात आला. तेव्हापासून नागरिकांना सतत भर दिवसाही बिबट्याचा वावर असल्याचे दिसत आहे.

यामुळे विद्यार्थी शेतकरी नागरिक व मजुरी करता इतर गावी व तिरोडा शहरात जाणाºया मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक महिला-पुरुष मजूरभीतीमुळे मजुरी करिता जात नसून बिबट दिसताच याची माहिती नागरिक स्थानीय वन विभागाचे अधिकारी कर्मचाºयांना देण्याकरता फोन केल्यास त्यांना प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांमध्ये स्थानिक वन अधिकारी कर्मचाºया विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आज दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता चे दरम्यान खडकी येथील महिला आपले घराचे मागील भागात चुलीवर पाणी गरम करण्यास ठेवून चार वर्षीय मुलगा हियांश शिवशंकर रहांगडाले याचे सह बसली असता अचानक एका बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर हियाश याची मान धरून ओढत नेले आईने मुलाचे पाय धरून बिबट्याच्या तोंडातून मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट मुलास ओढत घेऊन सुमारे पाचशे मीटर अंतरावर एका झाडीत घेऊन गेला असता लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन बिबटयाचा शोध घेतला असता बिबट मुलास झाडीत सोडून पळून गेला.

ही घटना परिसरातील गावांमध्ये समजताच परिसरातील गावकºयांमध्ये वन विभागाचे अधिकारी कर्मचाºयांचे विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. अनेक गावकरी लाटाकाठ्या घेऊन परिसरात बिबटाचे शोध घेऊ लागले तर काही गावकºयांनी स्थानिक वन अधिकारी कर्मचाºयांना या घटनेची माहिती देण्याकरिता फोन केले मात्र कोणीही नागरिकांना प्रतिसाद न दिल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढुन येथे मोठा जमाव जमल्याने तहसीलदार नारायण ठाकरे, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दरड पाटील आपले ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.

या दुदैवी घटनेची या माहिती वरिष्ठ वन विभागाचे अधिकाºयांना मिळताच सहाय्यक वनसंरक्षक गोंदिया विजय धांडे , उपवनसंरक्षक नवेगाव नागझिरा प्रीतसिंग, कोडापे, यांनी घटनास्थळी येऊन तहसीलदार नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक अमित वानखडे, खडकी सरपंच हितेंद्र बावणे, पंचायत समिती सदस्या कविता राज सोनवणे, यांचे मध्यस्थीने पीडित परिवारातील एका व्यक्तीस त्वरित उपलब्ध रोजगारानुसार तीन-तीन महिन्याकरिता हंगामी रोजगार उपलब्ध करून देऊन परिवारातील एका सदस्यास शासकीय कायमस्वरूपी नोकरी करता प्रस्ताव पाठवण्याची तसेच वन विभागातर्फे तातडीची ५० हजार रुपयाची रोख मदत करून उर्वरित २४ लक्ष मदत ८ दिवसाचे आत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

यासह खडकी परिसरातील झाडेझुडपे काढून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने नागरिकांचा रोष कमी झाल्याने मृत बालकाचे शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. तणाव निवळला असला तरी या परिसरातील बिबट जेरबंद झाल्याशिवाय नागरिकांची भीती कमी होणार नसल्याने वन विभागाने त्वरित या परिसरात वावरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती होताच आमदार विजयकुमार रहांगडाले, माजी आमदार दिलीप बनसोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले ,पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण, डोंगरगाव सरपंच शिशुपालजी पटले यांनी मृत बालकाचे परिवाराची भेट घेऊन सांत्वना देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *