सेंदूरवाफा येथे हुतात्मा भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सेंदूरवाफा (ता. साकोली) यांच्या वतीने क्रांतीवीर हुतात्मा भाई कोतवाल यांची पुण्यतिथी दि. ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास राजकुमार सर (सेवानिवृत्त, साकोली) हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुनीरामजी कावळे. अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा भंडारा हे होते.

यावेळी उद्घाटक विजयराव घोटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून सुरेशजी लांजेवार, जगदीशजी पोवनकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा भंडाराचे उपाध्यक्ष नंदकिशोर पारधी, कोषाध्यक्ष घनश्याम खडसे, संघटक ,सोपान जी दहेकर. प्रल्हादजी अनकर ,सेंदूरवाफा नगरसेवक शरदभाऊ पेगडे, हरिश्चंद्र चन्ने, पवनजी चौधरी, उके साहेब, सुभाष महामुले, अशोक उरकुडे, भीमराव डोंगरखार, रामदास डोंगर, परसोडीचे सरपंच भेंडारकर, विजय मल्लाम, नानाजी मेश्राम, उमेश पोषणकर, चंद्रचन्ने, सुनील बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माधुरी सूर्यवंशी व ममता लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जगदीश पोवनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेंदूरवाफा, साकोली, कुंभाली, परसोडी, होडी व सामगडी येथील समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक भोजनाने झाली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *