शेतमालाचे भाव २५-३० वर्षांपासून स्थिरच

 

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: ‘जय जवान जय किसान’, ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ हे ब्रीद आता उपमाच राहिल्या आहेत.सोन्याने मागिल दोन वर्षात लाखोंचा उच्चांक गाठला आहे.दिड लाख रुपये पार झाला आहे.तिथेच शेतकºयांचे पिवळे सोने,तूर,सोयाबीन,हरभºयाचे भाव गेल्या २५-३० वर्षांपासून तिथेच स्थिरावले आहेत.दोन-अडीच हजारावरच अडकून आहेत.सरकारकडून ही जय जवान जय किसानची आर्थिक पिळवणूक नाही तर काय?असा संताप परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतकºयांचा शेतमाल आणि लखपती व्यापाºयांच्या सोन्याच्या भावात ही मोठी तफावत म्हणजे सरकारला शेतकºयांचे सुख पहावत नाही. त्याला दु:खातच ठेवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

दरवर्षी बीयाणे,खते, कीटकनाशके,रसायनांचे दर वाढतच आहेत. तिथेच शेतमालाचे भाव सातत्याने कमी होत आहे.सद्या धानाला २३५९ रुपये हमीभाव आहे.पालांदूर परिसरासह लाखनी तालुक्यात हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यास प्रशासनाचे उशीर केल्याने शेतकºयांनीउत्पादीत धान हमीभावापेक्षाही कमी म्हणजेच १ हजार ८०० ते १ हजार ९०० रुपये प्रती क्विंटल दराने क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये कमी दराने धान विक्री केल्याने व्यापाºयांनी शेतकºयांची एकप्रकारे लुट सुरू केली असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.त्यामूळे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्याला मुद्दाम उशीर करून व्यापाºयंनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *