भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील ग्रामपंचायत चिरडी येथील अंदाजे ५० वर्षांपूर्वीची दोन मोठी झाडे अज्ञात व्यक्तीने कापून नेल्याने ग्रामपंचायत तर्फे याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला असता झाडे ग्रामपंचायतीची असल्याचा पुरावा मागितला असता ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद नसल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.

ग्रामपंचायत चुरडी येथील वार्ड क्रमांक तीन मधील सिसम व गुलमोहरची सुमारे पन्नास वर्षे जुनी दोन झाडे २२ जानेवारी २६ रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने कापून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन तिरोडा येथे तंटामुक्ती अध्यक्ष मंगल मेश्राम व सरपंचा सपना इनवाते देण्यास गेले .मात्र तिथे उपस्थित पोलिसांनी सदर झाडाची मालकी ग्रामपंचायतची असल्याचे पुरावे मागितले सदर झाडे अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीची असल्याने याचे पुरावे उपलब्ध नसले तरी ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे कडेने असल्यामुळे आपली नैतिक जबाबदारी समजून ग्रामपंचायत तर्फे पोलीस स्टेशन तिरोडा येथे तक्रार नोंदवण्यास गेले असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. याबाबत सरपंचा सपना इनोवा ते तंटामुक्ती अध्यक्ष मंगल मेश्राम यांनी प.स. सभापती तेजराम चव्हाण,गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांची भेट घेऊन संबंधित बाबीवर मार्गदर्शन मागितले आहे.