‘खुर्ची’ चा वाद ; पवनी नगराध्यक्षांचा जमिनीवर बसून कारभार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सत्ता स्थापन होऊन काही कालावधी जात नाही तोच पवनी नगरपालिकेत खुर्चीचा वाद रंगल्याचे दिसते. अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आणि बहुमत भाजपला अशी विचित्र स्थितीच यामागचे कारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दरम्यान आज नगराध्यक्ष विजया नंदुरकर यांनी पालिका कार्यालयात त्यांच्या कक्षात न बसता खाली बसून कामकाज हाताळल्याने वादाची चर्चा रंंगली आहे. याची सुरुवात २५ जानेवारी पासून झाल्याचे समजते.

पवनी नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून नागरिकांनी राष्ट्रवादीच्या डॉ. विजया नंदुरकर यांना कौल दिला. मात्र दुसरीकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पालिकेत उदयास आली. २० पैकी १३ नगरसेवक भाजपाचे निवडून आले. त्यामुळे पालिकेत राजकीय कुरघोडी होणार हे स्पष्ट होते. दरम्यान २५ जानेवारी पासून याला सुरुवात झाली असे म्हणता येईल. २५ जानेवारी रोजी उपाध्यक्ष असलेल्या सोनू बावनकर यांनी नगराध्यक्षांच्या कक्षात स्वत:ची खुर्ची लावून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

या विषयाला घेऊन नगराध्यक्ष व त्यांच्या पतीने आपल्याला जाब विचारल्याचे उपाध्यक्षांची म्हणणे आहे. सोबतच आपली खुर्ची कक्षातून बाहेर काढून तेथे कुलूप लावल्या गेल्याचा आरोपही उपाध्यक्ष बावनकर यांनी केला होता. तर आपल्या कक्षात परवानगी न घेता अनधिकृत प्रवेश करून, नंतर उपाध्यक्ष व त्यांच्या नगरसेवकांनी कुलूप लावल्याचा आरोप नगराध्यक्ष विजया नंदुरकर यांनी केला. या विषयाला घेऊन नगराध्यक्ष नंदुरकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाºयांना पत्र लिहून नेमका कक्ष कुणाचा याचा खुलासा करून लिखित स्वरूपात द्यावे अशी विनंती केली आहे. अजून पर्यंत या संदर्भात काहीच मिळाले नसल्याने आज नगराध्यक्षांनी चक्क नगरपालिकेच्या पोर्च मध्ये खाली बसून कामकाज केले. त्या ठिकाणी फाईलचा निपटारा करतानाचे फोटो समाज माध्यमांवर पसरले आणि खुचीर्चा हा वाद चर्चेत आला. सत्ता स्थापन होऊन दोन महिनेही झाले नाही मात्र पालिकेतप्रारंभ झालेल्या सत्ता नाट्याची सुरुवातच अशी झाल्याने पुढे आणखी काय होणार? हे समजू शकतो. दरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांनीही एकमेकांवर आरोप करीत आपण आपण बरोबर असल्याचे म्हंटले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *