
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज दि.३० जानेवारी २०२६ रोजी भंडारा कॉंग्रेस शहर अध्यक्ष धनराज साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई यांचे उपस्थितीत गांधी चौक भंडारा येथील गांधीजीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र श्रध्दांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी भंडारा नगरसेवक कमल साठवणे , प्यारेलाल वाघमारे जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष, मनोज बागडे महासचिव प्रदेश काँग्रेस , पृथ्वी तांडेकर माजी नगरसेवक, सेवादलाचे तुलसीदास बिलवने , हंसराज गजभिये , रवी लोंधासे, नरेंद्र साकोरे, नत्यू खंडाईत, दत्तू बावनकुळे, नरेशचंद्र कावळे, नरेश जीभकाटे , संघदिप डोंगरे, नंदा मोगरे, स्नेहा भोवते, कैलास दोनोडे,श्री विनोद अस्वले, फारुख शेख, बाबा पाटेकर आणि इतर सर्व मान्यवर यांनी पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.