परमपुज्य महानत्यागी जुमदेव बाबांचे कार्य समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे-लता बुरडे

यशवंत थोटे मोहाडी : मानव धर्माचे संस्थापक परमपुज्य महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजातील नागरिकांना वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून अलिप्त राहण्याचा संदेश दिला.त्यांच्या सम्यक विचाराचे अनुकरण केल्याने मानवास निश्चितपणे सुखमय जिवन जगता येते.त्यामुळे समाजातील नागरिकांनी वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून अलिप्त राहणे काळाची गरज आहे.परमपुज्य महानत्यागी जुमदेव बाबांचे कार्य समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारीका अध्यक्ष लता दिलीप बुरडे मोहाडी येथे मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

विदर्भाच्या पूर्वटोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्सुद्धा २८वे बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले.आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने सर्व सेवकांना कळविण्यात येते की,दु:खी गरीब व अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवनजगण्यास प्रेरीत करुन,वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून मुक्त करणारे मानव धमार्चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेने सामुहिक हवन कार्य मोहाडी मंडळातर्फे शुक्रवार दि.३० जानेवारी २०२६ ला आयोजीत करण्यात आले. शुक्रवार दि.३० जानेवारी २०२६ ला बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सांस्कृतीक भवन मोहाडी येथे सकाळी ९ ते १० वाजता सामुहिक हवन कार्य करण्यात आले.सकाळी १० ते १२.३० वाजतापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

दुपारी १२.३० ते ३.३० वाजता पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घघाटन आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारीका अध्यक्ष लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते तर ब.उ.प.पू.प.एक सेवक मंडळ मोहाडीचे जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष यशवंतराव ढबाले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात झाले. प्रारंभी हनुमान,बाबा जुमदेव,आई वाराणशी यांच्या छायाचित्रालाला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. विशेष अतिथी जि.प.भंडाराचे बांधकाम व शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर,जि.प.सदस्य देवेंद्र ईलमे,पं.स.सदस्य उमेश भोंगाडे,आशा सतिश बोंदरे,नगराध्यक्ष छाया डेकाटे,नगरसेविका रेखा मनोहर हेडाऊ,वंदना क्रिष्णा पराते,बावणे कुनबी समाज अध्यक्ष उमेश मोहतुरे,कंत्राटदार इंजि.विपीन विलास चौधरी चंद्रपूर,मयुर देवरे,प्रियंका देवरे हे होते. मानव जागृती व अंधश्रद्धा निर्मुलन यावर परिसंवाद महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीवर मार्गदर्शन झाले.मेरी लाज रखना रिमिक्स यावर स्वागत नृत्य कु.शिवानी दिलीप बुरडे कांद्री,कु.प्रगती विलास बुधे,कु.दीपिका हेमराज बोंदरे,कु.आयुषी रविंद्र बुद्धे,कु.रुपाली कवळू बिल्लोरे ढोरवाडा यांनी वेशभूषेत प्रस्तुत केले.

चंद्रपूर येथील ६ वर्षीय चि.रेहांस योगेश दिवसे चंद्रपूर या बालकाने व्यासपीठावर जाहीरपणे माईकवर बाबा जुमदेव यांची प्रार्थना म्हणून दाखविल्याने उपस्थित सेवकसेविकाकडून टाळ्यांच्या कडकडाट झाला.मानव धर्माच्या कर्तव्यात झालेल्या चुकांचे परिणाम सेवकांना भोगावे लागतात.परमात्मा एक सेवकांनी बाबांच्या विचारांनी जगले पाहिजे.मनुष्य सत्याचा विचाराने नाही तर कर्माअभावी दु:खी व गरिब होतो.सुखामध्ये सर्व सहभागी होतात.दु:खामध्ये कुणीही सहभागी होत नाही.सेवकांनी ध्येयवादी जगले पाहिजे तरच प्रगती होईल.महानत्यागी बाबांच्या नावात ताकत आहे.भगवंतांचे नाव कुठेही केव्हाही घेतले तरी फळ मिळते.त्यासाठी कर्तव्य चांगले असले पाहिजे तरच समाधान मिळते.जिवन जगण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा,याची गरज आहे.तशीच जीवन जगण्यासाठी चांगल्या विचारांची सुद्धा गरज आहे.

बाबांनी भगवान बाबा हनुमानजींना सार्थ केले.सेवकांना एका भगवंताला मानून आपले जिवन व्यथित करावे,बाबांनी दिलेल्या तत्त्व,शब्द,नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास जिवनात सफलता मिळेल यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटिका आध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारीका अध्यक्ष लता दिलीप बुरडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. झाकीचे बक्षिस प्रथम बक्षीस २१हजार ५०० रुपये नरेश ईश्वरकर यांच्याकडून रामा सव्वालाखे चिचाळा,व्दितीय २१ हजार रुपये दिनकर काटेखाये गुरुजी भंडारा यांच्याकडून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सुकळी,तृतीय १५ हजार रुपए अरुण सोमा बारई मोहाडी व कोमेश ठवकर मोहगांवदेवी यांच्याकडून रामेश्वर बोंदरे नरसिंगटोला,

चतुर्थ ११ हजार रुपए धनपाल चौधरी सुकळी व राकेश निमजे वरठी यांच्याकडून शँकर पोटभरे कन्हानकांद्री,पाचवा ७ हजार रुपए रामकृष्ण कुकडे निलज बु.यांच्याकडून रघुनाथ ईलमे भिकारखेडा, सहावा ५ हजार रुपए श्रीकृष्ण ईटनकर डोंगरगांव यांच्याकडून संजय पंचबुद्धे मांढळ,सातवा ४ हजार ५०० रुपये संजय हुकरे गुरुजी मोखारा यांच्याकडून परमात्मा एक सेवक मंडळ रोहणा,आठवा ४ हजार रुपए मारोती शहारे परसवाडा सिहोरा यांच्याकडून जितेंद्र कुलरकर डोंगरगाव, नववा देवेंद्र नागफासे जांब,दहावे रामा शेंडे मोहंगावदेवी,अकरावे शालीकराम निकुळे मोहाडी,बारावे राजेंद्र आहडे हिवरा,तेरावे संजय नागपूरे खूटसावरी,चौदावे गंगाधर नागपूरे खुटसावरी,पंधरावे प्रकाश कदमकर डोंगरगाव,सोळावे वसंता मोखरकर सिलेगाव यांना आयोजक उपाध्यक्ष देवचंद सेलोकर,सचिव युवराज गलबले,कोषाध्यक्ष राकेश लिल्हारे,सहसचिव रोहित शेंडे,संचालक रामनरेश बोंदरे,सहादेव लुटे,अशोक बोंदरे,हितेश ढोबळे,विजय निमकर,शालू प्रकाश निंबार्ते,

संयोजक अध्यक्ष यशवंतराव ढबाले,सचिव मोरेश्वर सार्वे,कोषाध्यक्ष कंठीराम पडारे,सहसचिव राजु पिलारे,संचालक नत्थु कोहाड,एकनाथ जिभकाटे,राजु माटे,गुरुदास शेंडे,सरस्वता माटे,व्यवस्थापक भगवान पिलारे,संगणक चालक लक्ष्मण माहुले,शिपाई आकाश ठवकर,विलास चौधरी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.स्मृर्तीचिन्ह राजु माटे अकोला टोला,श्रीकृष्ण झंझाड मोहाडी,स्व.रतिराम जिभकाटे यांचे यांचे स्मृतीप्रित्यर्थ एकनाथ जिभकाटे डोंगरगाव,रवि वंसता शेंडे सालई बु.,शाशिकांत पाटील मोहाड़ी,स्व.मनोहर ठवकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ वैभव ठवकर मोहगांवदेवी,मयुर फर्निचर मार्ट विनोद शेषरावजी ठवकर चिचखेडा,स्व.सहसराम बोंदरे यांचे स्मृतीप्रित्यर्थ रामनरेशजी बोंदरे सुकळी,चि.सागर गौरीशंकर मेहर मोहाडी यांच्याकडून देण्यात आले. प्रास्ताविक मोरेश्वर सार्वे यांनी केले.संचालन इंद्रपाल मते व विजय दमाहे यांनी केले.

आभार उमेश भोंगाडे यांनी मानले.मोहाडी येथील भव्य सेवक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शेषराव ठवकर,विनोद तांडेकर,अंकुश चकोले,परमेश्वर बुधे,धनंजय कांबळे,पंढरी चारमोडे,शशिकांत गायधने,अक्षय चामट,रमेश झंझाड,सुनिल कस्तुरे, हेमराज शेंडे,शिवम भलावी,तेजराम आंबिलकर, प्रमोद माटे,गोपाल लिल्हारे,दिनेश गडरिये,संजय ठाकरे,जानसन दमाहे,प्रदिप सुलाखे,रोशन गराडे,सुरेश निंबार्ते,योगेश बुरडे, अशोक सव्वालाखे, राजेश वेद्य, संजय पंचबुधे, आकाश डोये, सागर सव्वालाखे,रामदास सव्वालाखे,यादोराव बुराडे,भाष्कर निंबार्ते, राकेश जिभकाटे,महिला समितीचे अध्यक्ष दुर्गा गौरीशँकर मेहर,वनिता वंजारी,फोटोग्राफर विपीन सुधन्वा लेंडे,रणधीर निमजे,राज सार्वे यांच्या चमुच्या सहकाºयांनी परिश्रम केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *