
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदतर्फे स्थानिक पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या दुकान गाळे वाटपात जिल्हा परीषद पदाधिकाºयांनी स्थानिक बेरोजगारांना डावलत मर्जीतील लोकांना गाळे वाटप केल्याचा आरोप येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतींसह सर्व सदस्यांनी पत्रकार परीषदेतून केला आहे. तर प्रति गाळे ३० ते ४० लाख रुपयांची वसूली करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.
पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले यांच्या कक्षात शुक्रवार ३०जानेवारी रोजी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह उपसभापती शिवलाल जामरे, माजी उपसभापती निरज उपवंशी, पंस सदस्य शैलजा सोनवाने, मीनाक्षी बारलिंगे, कणिराम तावाडे, विद्याकला पटले, राहुल मेश्राम, मंजु डोंगरे, वंदना पटले, अजाबराव रिनाईत, हिरामण दहाट यांच्यासह सर्व २८ पंस सदस्य उपस्थित होते.
पुढे माहिती देताना रहांगडाले म्हणाले, तालुकास्तरावरील ग्रामीण भागातील बेरोजगार, महिला बचत गटातील महिला, दिव्यांगांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा निधी अंतर्गत येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ८ व महिला बालकल्याण विभाग कार्यालयाच्या आवारात ३ असे ११ दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. जिपकडून दुकान गाळे लिलाव प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने करणे अपेक्षित होते. असे न करता जिप मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख पदाधिकाºयांनी संगनमत करून गाळे वाटपाची माहिती नागरिकांना होऊ नये यासाठी संबंधित पोर्टलच हॅक केल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी करीत मर्जीतील व्यक्तींना गाळे देत त्यांच्याकडून प्रत्येकी एका गाळ्याचे ३० ते ४० लाख रुपये वसूल केल्याचा घणाघात यावेळी सदस्यांनी केला. एकूणच हा प्रकार हितसंबंधात झाल्याची शंका नाकारता येत नसल्याने गाळे वाटप प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने दुकान गाळ्यांचे पुन्हा वाटप करावे, अशी मागणीही पंस पदाधिकाºयांनी केली.