राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फलकावर अजित पवार यांचे छायाचित्रच नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या अधिकृत फलकावर अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वतुर्ळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हा मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या गोंदिया या गृह जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.

सदर फलकावर फक्त खासदार प्रफुल पटेल यांचेच छायाचित्र ठळकपणे झळकले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या अजित पवार यांचा फोटो अनुपस्थित राहिल्याने, हा केवळ ‘डिझाइनचा भाग’ नसून एक सूचक राजकीय संदेश असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते, हा प्रकार ‘स्वतंत्र ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न’ दर्शवतो, तर काहींनी याला ‘पक्षातील अंतर्गत मतभेदांची झलक’ असेही संबोधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) मध्ये अलीकडच्या काळात सुरू असलेल्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे राजकीय विश्लेषण अधिकच गळद झाले आहे. राष्ट्रवादी पक्षावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हालचाली सूचक पद्धतीने प्रकट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. ‘फलकावर’ सारख्या प्रतीकात्मक माध्यमातून दिला जाणारा संदेश हा केवळ दृश्य स्वरूपाचा नसून, तो अंतर्गत सत्त- ासमीकरणांची झलक देणारा असतो, असे निरीक्षणही व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्वत:ला ‘अजितदादा प्रेमी’ म्हणवणारे काही आमदार व पदाधिकारी या प्रकरणावर मौन बाळगत असल्याने, त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पक्षनिष्ठा आणि वैयक्तिक निष्ठा यामधील संघर्ष उघडपणे समोर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही कार्यकर्त्यांनी या मौनाला ‘राजकीय ढोंग’ अशी उपमा दिली आहे. तिरोड्यातील या मेळाव्यात कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असला, तरी फलक प्रकरणानेच साºयांचे लक्ष वेधून घेतले. सभेत मांडण्यात आलेल्या विषयांपेक्षा, फलकावरील अनुपस्थिती अधिक चर्चचा विषय ठरली, हीच या घटनेची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली. या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय वतुर्ळात त्याचे पडसाद उमटत आहेत. आगामी काळात या घटनेचे पडसाद पक्षाच्या धोरणांवर आणि नेतृत्वाच्या समीकरणांवर कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *