‘त्या’ ३२ गावांचे होणार पुनर्वसन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आा. नरेंद्र भोंडेकर यांच्या अधिवेशन दरम्यान लावण्यात आलेल्या लक्षवेधी प्रश्नाचे औचीत्य साधत आज मदत व पुनर्वसन विभाग तर्फे सभेचे आयोजन करण्यात अले. मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या आदेशावर त्यांच्या मुंबई येथील दालनात हि सभा अयोजित करण्यात अली होती. ज्यात आ.भोंडेकर यांच्या द्वारे करण्यात आलेल्या मागण्यांवर सर्व्हे करून एक महिन्याच्या आत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांनी संबंधित विभागाला दिले.

यात त्या ३२ बाधित गावांचे पुनर्वसन सुद्धा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे उल्लेखनीय असे कि भंडाराजिल्ह्यात गोसे प्रकल्पाच्या निर्मिती नंतर प्रकल्पबाधितांच्या भूमी हस्तांतरित करण्यात आल्या परंतु त्यांना आवश्यक तसा मोबदला देण्यात आलेला नाही. इतकेच नाही तर त्यांना मुलभूत सुविधा सुध्दा देण्यात आल्या नाही. तसेच भंडारा विधान सभा क्षेत्रातील अंशत: बाधित ३२ गावांचे पुनर्वसन हे पूर्णत: बाधित गावांच्या नियमा प्रमाणे करण्यात यावे व प्रलंबीत ड्रोन सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आम. नरेंद्र भोंडेकर यांनी अधिवेशन दरम्यान आपल्या लाक्षवेधी प्रश्नात केली होती. यात भंडारा विधानसभा मधील खमारी, खापा (अजिमाबाद), मुजबी,दवडीपार (बेला), दाभा, गणेशपुर, भोजापुर, सालेबर्डी, कारधा, तिड्डी, निमगाव, अजुर्नी टोली, मेंढा, कोरंभी देवी, बेला, कोथुर्णा, खैरी, पेवठा, कोंढी, कवडशी, बेरोडीटोला, करचखेडा, जमनी, लोहारा, भंडारा खास. पाहूनगाव, इटगाव, कुर्झा, खमाटा, बेटाळा, सुरबोडी, बोरगाव बुज, टोली या गावांचे समावेश होते.

यावर मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांनी तात्काळ बैठक लावून याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या संदर्भात आज नाम. आशिष जयस्वाल यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात अली. यात वरील बाधित गावांकरिता भूसंपादन करून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करिता एक महिन्याच्या आत संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नाम. जयस्वाल यांनी दिले. हा भूसंपादन मदत व पुनर्वसन विभाग आणि जलसंपदा विभाग संयुक्त रित्या करतील असे निर्देश सेण्यात अले असून पुनर्वसाना नंतर बाधितांच्या भूमीची संपूर्ण जवाबदारी हि जलसंपदा विभागाची राहील असे निर्देश सुध्दा देण्यात आले. या बैठकीत गोसे खुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी लीना फलते, गोसे पुनर्वसन विभाग नागपूर चे कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे, उपविभागीय अधिकारी संदेश पिंपरकर, जल संपदा विभागाचे अधीक्षक अभियंता व उपसचिव प्रविण कोल्हे, कक्ष अशिकारी प्रियांका शिंदे, सहाय्यक अधीक्षक योगेश वाघ, अपर सचिव प्रिती वारख्रेडे सह अन्य अधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *