मोहरना गावात बिबट्याचा संचार,नागरीकांत भिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर: तालुक्यातील मोहरना येथे मध्यरात्रीच्या २.१५ वाजता सुमारास विलास पिलारे यांच्या घराभोवताल फिरत असताना सीसीटी कॅमेराद्वारे फिरत दिसत होता . यावेळी अचानक विलास यांना झोपेतून जाग आल्यानंतर कुटुंबीयांना सांगितल्यावर कुटुंबीय घाबरत होते . मात्र बिबट हा वैनगंगा नदीच्या दिशेने पळत जाताना कॅमेºयात े दिसत होते. जंगलातून भटकत शेतश्-ि ावारात पोहोचलेल्या एका बिबट्याचा गेल्या काही दिवसापासून मोहरणा,गौराळा , कुडेगाव, मांदेड शेतशिवारात संचारामुळे परिसरातील शेतकरी. मंजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चौरास क्षेत्रात येणाºया या भागात यावर्षी हंगामाच्या अखेरीस शेतकºयांनी रब्बी पिकाची पेरणी केली आहे या पिकाची निगा राखण्यासाठी शेतकरी व मजुरांना नियमितपणे शेतात जावे लागते काही दिवसापासून एक बिबट या परिसरात व गावात फिरत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे . त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *