भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुक; ७ उमेदवारांचे ११ अर्ज दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत ७ उमेदवारांचे ११ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यात प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल (अपक्ष) ३ अर्ज, दिलीप वामन बनसोड (इंडियन नॅशनल काँग्रेस)१, अविनाश आनंदराव ब्राह्मणकर(भाजप) २ अर्ज, अभिषेक जगदीश कारेमोरे २ अर्ज (भाजपा/अपक्ष), सचिन यशवंत कुंभलकर अपक्ष १ अर्ज, नरेश माणिक ईश्वरकर अपक्ष १ अर्ज व भास्कर ओंकार रहांगडाले अपक्ष १ अर्ज यांचा समावेश आहे. भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी २५ मे २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून म्हणजेच आजची होती. अर्जांची छाननी मंगळवार, दि. २ जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दि. ४ जून असुन मतदान दि. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २२ जून रोजी करण्यात येईल.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *