
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारा तर्फे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.११ ते १४ एप्रिल दरम्यान चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आयोजित कार्यक्रमामध्ये नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारा चे अध्यक्ष मृणाल गोस्वामी यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतुन कले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असुन यानिमित्त विविध प्रबोधनात्मक सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गांधी चौक परिसरात असलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात येईल त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता दसरा मैदान शास्त्री चौक भंडारा येथे प्रियंका भारती राष्ट्रीय प्रवक्ता राष्ट्रीय जनता दल बिहार जे एन यु स्कॉलर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. प्रियंका भारती ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मागासवर्गीयांच्या चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या आहेत अनेक राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्या रोखठोकपणे शासन धोरणाबद्दल बोलत असतात त्यांच्या या जाह- ीर व्याख्यानांनी नक्कीच भंडारा वासियांना मार्गदर्शन होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. १२ एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता दसरा मैदान शास्त्री चौक भंडारा येथे ‘काळजावर कोरलं नाव आमचं भीमा कोरेगाव’ या गाण्याचे गायक अजय दहाडे आणि संच यांचा ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आहे.
ज्यामध्ये भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच भंडारा शहरांमध्ये नवनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक व विविध क्षेत्रांमधील गनमान्य लोकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता समाज कल्याण भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे. तर रात्री ११.३० वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मानवंदना व आतिषबाजीचा कार्यक्रम त्रिमूर्ती चौक भंडारा येथे पार पडेल. १४ एप्रिल रोजी दिवशी सकाळी ८.३० वाजता भंडारा नगर परिषद समोर अभिवादन सभा व सकाळी ९ वाजता टाकळी येथून भव्य बाईक रॅली तसेच १० वाजता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ६ वाजता शास्त्री चौक भंडारा येथून भव्य समता रॅली काढण्यात येणार आहे.त्यामध्ये जवळपास २७ झाक्या असणार असुन आंबेडकर वार्ड येथील संसद भवनाची झॉंकी या रॅलीचे विशेष आकर्षण असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मृणाल गोस्वामी, कार्याध्यक्ष सुरेश खंगार, सचिव पायल सतदेवे,कोषाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी दिली. या वेळी प्रफूल शेंडे,चांद डोंगरे, विनय बन्सोड ,पराग खोब्रागडे, सम्यक खोब्रागडे आदि उपस्थित होते.