अवघ्या २४ तासात दुकानफोडी करणाºया टोळीचा पर्दाफाश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरासह जवाहरनगर व तुमसर शहरात झालेल्या दुकानफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत सुमारे ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ एप्रिल २०२६ च्या रात्री भंडारा शहरासह जवाहरनगर येथे आणि दि. ९ एप्रिल २०२६ रोजी तुमसर येथे दुकानांचे शटर फोडून चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भंडारा व तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान नागपूर येथील विधिसंघर्षित बालकांसह काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी दुकानफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सिसिटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत असून, अधिकाधिक नागरिकांनी आपल्या घर व व्यवसाय ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावावेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *