
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील सोमलवाडा मेंढा येथे छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ सोमलवाडा/मेंढा येथे शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात व अभिमामानाने साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज युवा मंडळ सोमलवाडा/मेंढा यांनी पुढाकार केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांया पुतळ्याचे भुमीपुजन करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून राज्यभिषेक करण्यात आला. याप्रसंगी भुमीपुजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन माजि जि.प.सदस्य जुल्पीकारजी हुमणे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण विस्तार अधिकारी नरेश टिचकुले तर विशेष अतिथी म्हणुन अधिस्वीकृती धारक पत्रकार हेमंतभाऊ अतकारी, श्रीराम दुग्ध डेअरी लाखनी अध्यक्ष सतिशभाऊ टिचकुले,बी.टी.बी. सब्जी मार्केट भंडाराचे बंडुभाऊ बारापात्रे, संजय टिचकुले सर,संजय अतकारी, घनश्यामजी अतकारी, विश्वजीत हुमणे, सदानंद फंदे,नेमीचंद फंदे, गोपीचंद मते, गण्ोश लुटे, डॉ.विश्वास, कु.जान्हवी अतकारी, मोतीराम कडव, अर्जुन फंदे, नारायण हुमणे, किशोर बुराडे, उमेश लुटे तसेच मंडळाचे अध्यक्ष विक्रम लांजेवार, उपाध्यक्ष निवृत्ती अतकारी, आस्तीक मस्के तसेच मंडळाचे सर्व सदस्यगण मनिष मेश्राम, शैलेश बुराडे तसेच संपुर्ण सोमलवाडा गावकरी मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. तत्पुर्वी शालेय विद्यार्थ्यानी नृत्य सादर केले.