मोहाडी तालुक्यातील ४ पोलीस स्टेशन हद्दीतील १२१ गावात ३९१ होलिकांचे होणार दहन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : फाल्गुन पौर्णिमेला हर्ष उल्लासात साजरा होणारा होळीचा सण चहूबाजूंनी आनंदाची उधळण करणारा व पूर्णपणे आनंदात डूबवून टाकणारा होळी हा हिंदूचा सण होय, होळी रे होळी पुरणाची पोळी, सोबतीला आहे गाठ्याची गोडी असे म्हणत मुले नाचून याप्रसंगी आपला आनंद व्यक्त करीत असतात, एकमेकावर रंग उधळणे, गुलाल लावणे व रात्रीला होळी पेटवणे या सणाचे खास आकर्षण आहे. विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या मोहाडी तालुक्यातील परंपरागत आज सोमवार दि.२ मार्च २०२६ राजी मोहाडी तालुक्यात १२१ गावात होलिका दहन होईल.

मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक राहुल चौधरी, अतुल प्रकाश बडवाईक, सुनिल लक्ष्मण हुकरे यांच्या हद्दीत येणाºया ३१ गावात सार्वजनिक १३० तर खाजगी ४१ अशी एकूण १७१, आंधळगाव पोलीस ठाणेदार नितीन राठोड, विजेंद्र सिंगणजुडे यांच्या हद्दीत येणाºया ४७ गावात सार्वजनिक २८ तर खाजगी ५ असे एकूण ३३. करडी पोलीस स्टेशन ठाणेदार गलहोत, वैभव काळे, विनोद बोरकर यांच्या हद्दीत येणाºया २५ गावात सार्वजनिक ६८ तर खाजगी १४ एकूण ८२, वरठी पोलीस ठाणेदार निलेश गिरी, निलेश चौधरी, आदिती ईलमकर यांच्या हद्दीत येणाºया २१ गावात सार्वजनिक ६० तर खाजगी ४५ असे एकूण १०५ होलिका दहन होणार आहे. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे,मनोज सिडाम तसेच संबंधित मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, आंधळगाव पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन राठोड, करडी पोलीस स्टेशन ठाणेदार गौरीशँकर गलहोत, वरठी पोलीस स्टेशन ठाणेदार निलेश गिरी यांच्या हद्दीतील मोहाडी तालुक्यात १२१ गावात सार्वजनिक २८६ तर खाजगी १०५ असे एकूण ३९१ होलिका दहन होणार आहेत.

मोहाडी पोलिस स्टेशनचे त्रिमूर्ती केशव लांडगे, हरीचंद्र जैराम चाचेरे, स्वप्नील संतोष मते, सचिन चुन्नीलाल मालाधरे, हेमलता मलेवार, सविता दिंडे, विनोद शिवचरण लांगडे, दमयंती शिरम सावरकर, किरण मनोहर मोहतुरे, आशिष शिवराम वालदे, दिक्षा नखाते, अशोक बाबुराव लांजेवार, सुधेश लांजेवार, ताराचंद दाजी उराडे, विनोद यादोराव थोटे, मेघा बालकदास वैद्य, रामरतन लक्ष्मण खोकले, ज्ञानेस्वर भैय्या भलावीर, प्रभाकर एका बारापात्रे, विजय राघोर्ते, दिव्या शिवशँकर टांगले, दुर्योधन ईश्वर भुरे, नागोराव गायधने, भैय्या सुरेश शेंडे, पृथ्वीराज शामराव राठोड, कल्पना भांदुसा फड, मुकेश शिवशंकर भोंगाडे, सतिश सपकाळ,वामन केशोराव गायधने, ज्योत्स्ना सुरेश बाणासुरे, किरण लुटे, राजेंद्र भोंगाडे, बाळकृष्ण अशोक पाठक, देवेंद्र शिवलाल चोपकर, अल्फिया जाहिद हुसेन, इंदिरा घोनमोडे यांचा बंदोबस्त राहील.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *