अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल साकोली ला ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा’ पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानिक अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल या शाळेला नागपूर येथे आयोजित विशेष समारंभात ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘एम आय एम एन एस ए. एड्युनेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड’ तर्फे प्रदान करण्यात आलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि मूल्याधारित शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कायार्ची दखल घेणारा ठरला आहे. अल्पावधीतच शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, सहअभ्यासक्रमातील यश, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम तसेच आधुनिक शिक्षण पद्धतींची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. समर्पित शिक्षकवृंद, उत्साही विद्यार्थी आणि विश्वासू पालक यांच्या सातत्यपूर्ण सहकायार्मुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शाळेचे संचालक डॉ. राजेश चंदवानी, सचिव डॉ. गीता चंदवानी तसेच शाळा व्यवस्थापक जी. एच. ठाकरे यांच्या गतिमान नेतृत्वाखाली पारंपारिक मूल्ये आणि आधुनिक अध्यापनशास्त्र यांचा संगम साधणारे सकारात्मक व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उभे राहिले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संचालक, सचिव, व्यवस्थापन समिती व पालकवर्गाने शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ही कामगिरी भविष्यात अधिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारी ठरत असून जबाबदार, आत्मविश्वासू आणि संवेदनशील भावी नागरिक घडविण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *