अवैधरित्या रेतीचा उपसा करणारी जेसीबी जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी पोलीसांनी पवनी तालुक्यातील भोजापुर रेतीघाटातुन अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतुक करणाºया जेसीबी चालकावर कारवाई करीत जेसीबी जप्त केली. पवनी पो. स्टेशनचे पोलीस शिपाई चांदकर हे त्यांच्या पथकासह अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्याकरीता गस्तीवर असतांना त्यांना भोजापुर रेतीघाटातुन अवैधरित्या रेतीचा उपसा व वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली.

पोलीसांनी त्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता आरोपी जे. सि. बी. व ट्रॅक्टरचे सहाय्याने मौजा भोजापुर रेतीघाटातुन रेतीचा अवैध रेतीचोरी करतांनी दिसुन आले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला असता जे.सी.बी. क्रमांक एम.एच.४०/पी. १४८१ किमती ४० लाख रूपये मिळुन आली तर ट्रॅक्टर पळुन जाण्यात यशस्वी झाला. पोलीसांनी जे.सी.बी. चालक / मालक उत्तम खोब्रागडे रा. भोजापुर, अंबीका हिंगमिरे रा. वर्धा, दिवानजी देवेंद्र पडोळे भोजापुर व पळुन गेलेला ट्रॅक्टर चालक / मालक जनार्धन पडोळे रा. भोजापुर यांचविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , पवनी पो.नि. ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात पो. शि. चांदकर, पो. शि. बागडे, पो. शि. मोहरकर, पो.स्टे. पवनी यांनी केली असुन पुढील तपास सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *