बेफाम वेगाला इंटरसेप्टरचा ‘ब्रेक’

प्रतिनिधी गोंदिया : शहरासह जिल्ह्याील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गतवार्षी ५ डिसेंबर रोजी गोंदिया पोलिस दलमध्ये दाखल झालेल्या इंटरसेप्टर वाहनाने अवघ्या काही महिन्यांतच धडाकेबाज कामगिरी नोंदवली आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत अतिवेगाने वाहन चालविणाºया २२७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रस्त्यांना रेसिंग ट्रॅक समजून वेगमर्यादा भंग करणाºयांवर अत्याधुनिक स्पीड गन व कॅमेºयांच्या सहाय्याने अचूक कारवाई केली जात आहे. याशिवाय, हेल्मेटविना दुचाकी चालविणाºयांवरही पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. ७६ दुचाकीस्वारांची नोंद करून त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अपघातातील जीवितहानी रोखण्यासाठी ही मोहीम शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर सातत्याने सुरू असल्याची माहिती जिल्हा वाहतुक शाखा, गोंदिया कडून देण्यात आली. इंटरसेप्टर वाहनामध्ये वेग मोजण्याची अत्याधुनिक यंत्रणा, पुराव्यासाठी उच्च क्षमतेचे कॅमेरे आणि तत्काळ दंड नोंदविण्याची सुविधा असल्याने नियमभंग करणाºयांवर त्वरित व पारदर्शक कारवाई शक्य होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *