
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : कवलेवाडा येथून अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तिरोडा तहसीलदाराचे पथकाने जप्त करून प्रकरण उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केले आहे. तहसीलदार तिरोडा नारायण ठाकरे आपले पथकाचे महसूल अधिकारी अनिल भूते,पवन चाफले, महसूल सेवक उमेश भोयर, अरविंद कुराडे, पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम यांच्या सह दिनांक २१ चे पहाटे कवलेवाडा मार्गावर गस्तीवर असताना त्यांना तहसील कार्यालया जवळील पाणी टाकीजवळ कवलेवाडा कडून दोन निळ्या रंगाचे ट्रॅक्टर येताना दिसल्यावरुन ते ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता दोन्ही ट्रॅक्टरचे ट्रालीमधे रेती असल्याचे दिसून आले.
ट्रॅक्टर चालकांना रेती वाहतूक उत्खननाचे परवाना बद्दल विचारणा केली असता त्यांनी आपल्याकडे रेती उत्खनन व वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. ट्रॅक्टर चालक व मालकाचे नाव विचारले असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच 36 डी ८५ ०५ हा गुड्डू भैरव कवले वाडा यांचा असून चालक जितेंद्र दिगंबर नेवारे राहणार शास्त्री बाग तिरोडा तर दुष्काळ ट्रॅक्टर मालक विनोद हिरामण पारधी रा. कवलेवाडा यांचा असून चालक आशिष श्रीराम चौधरी दोन्ही रा. कवलेवाडा ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३५ ए आर २०१७ चा पंचनामा करून दोन्ही ट्रकटर तहसील कार्यालय तिरोडा येथे जमा करून प्रकरण उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.