लाखांदूरच्या तरुणाचा ‘देसी जुगाड’; पाण्याची टाकी अन् ट्रॅक्टरच्या ट्युबपासून बनवला बायोगॅस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : सध्या सुरु असलेल्या आखाती देशातील युध्दामुळे भारतात गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाचा तुटवडा व दिवसेंदिवस गॅस सिलिंडरचे गगनाला भिडलेले भाव आणि एजन्सीकडे मारव्या लागणाºया चकरा यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. मात्र, लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथील एका जिद्दी तरुणाने यावर एक अनोखा आणि स्वस्त मार्ग शोधून काढला आहे.

केवळ घरातील टाकाऊ वस्तू, पाण्याची टाकी आणि ट्रॅक्टरच्या निकामी ट्युबचा वापर करून या तरुणाने यशस्वीरित्या ‘बायोगॅस’ची निर्मिती केली असून, परिसरात या ‘देसी जुगाडा’ची मोठी चर्चा होत आहे. या तरुणाने टाकाऊ साहित्यातून हा प्रकल्प उभा केला आहे. घरातील खराब झालेली पाण्याची टाकी आणि ट्रॅक्टरच्या ट्युबचा वापर करून साध्या सोप्या पद्धतीने गॅस निर्मिती केली जात आहे. शेण आणि घरातील ओल्या कचºयाचा वापर करून नैसर्गिकरीत्या गॅस तयार केला जातो, जो स्वयंपाकासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. आजच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत हजाराच्या पार गेली आहे. दुर्गम भागात वेळेवर गॅस उपलब्ध होणे कठीण असते. अशा परिस्थितीत लाखांदूरच्या या तरुणाने मांडलेला हा आदर्श ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय घराच्या अंगणात हा प्रकल्प उभारता येत असल्याचे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *