तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट आहार आणि अस्वच्छतेचा कारभार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा आहार, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. या अव्यवस्थेविरोधात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णालय प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. जर आहारात सुधारणा न झाल्यास रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

शासकीय मेन्यू कागदावरच; रुग्णांना अंडी नाकारली

शासकीय नियमांनुसार रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या आणि गंभीर रुग्णांना वैद्यकीय गरजेनुसार उच्च प्रथिनयुक्त आहार म्हणून उकडलेली अंडी देणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून शासनाचा अधिकृत मेन्यू धाब्यावर बसवला जात असून रुग्णांना अंडी दिली जात नाहीत. तसेच पुरवला जाणारा आहार अत्यंत निकृष्ट व खाण्यायोग्य नसून, रुग्णांना नाईलाजाने उपाशी राहावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

तपासणी अधिकारी गायब; परिचारिकेवर प्रभारी भार

नियमानुसार रुग्णांना आहार वितरीत करण्यापूर्वी जबाबदार अधिकाºयाने त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असते. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात अधिकृत तपासणी अधिकारीच उपलब्ध नाही. प्रशासनाने या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीचा भार एका परिचारिकेवर (नर्स) सोपवूनस्वत:ची सुटका करून घेतली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *