शिवनीबांध शासकीय मत्स्य बीज केंद्राच्या २५ वर्षांच्या भाडेपट्टा निविदेला स्थगिती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील शासकीय मत्स्य बीज केंद्र २५ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्याची प्रक्रिया शासनाने तात्काळ स्थगित केली आहे. स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था, मत्स्य व्यावसायिक आणि जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासाठी आमदार परिणय फुके व आमदार अविनाश ब्राम्हणकर यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या विषयावर मुंबई येथे दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेतली. या बैठकीत शिवनीबांध शासकीय मत्स्य बीज केंद्राच्या २५ वर्षांच्या भाडेपट्टा निविदेला तात्काळ स्थगिती देण्याचेआदेश देण्यात आले. तसेच भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज निर्मिती वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कर्मचाºयांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे आश्वासनही देण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *