लाखनी वनक्षेत्रातील अतिक्रमणांवर वनविभागाचा बुलडोझर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : भंडारा वनविभागाच्या साकोली उपविभागांतर्गत लाखनी वनक्षेत्रामध्ये अवैधरित्या करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात वनविभागाने धडक कारवाई करत एकूण १.०२ हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. यात मौजा भुगाव-मेंढा येथील गट क्रमांक ३४३ नवीन राखीव वन क्षेत्रातील किशोर चंद्रशेखर चौबे, हरीदास लहानू दोनोडे व भारत विठोबा ठाकरे यांनी केलेले ०.४७ हेक्टर, मौजा सोनपुरी येथील संरक्षित वन गट क्रमांक ७० मधील ऋषी रामटेके व प्रदीप पळसपाणी यांचे ०.४० हेक्टर तसेच मौजा पोहरा येथील झुडपी जंगल गट क्रमांक ५३४/२ मधील मुकेश डोलीराम मते यांचे ०.१५ हेक्टर अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, वनक्षेत्रात अतिक्रमण हा भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत दंडनीय अपराध असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

भंडारा वनविभागातील साकोली उपविभागांतर्गत लाखनी वनक्षेत्रामध्ये काही स्थानिक नागरिकांनी वनजमिनीवर अतिक्रमण केल्याचे वनकर्मचाºयांच्या निदर्शनास आले होते. यानंतर संबंधितांविरोधात भारतीय वन अधिनियम, १९२७ अन्वये वनगुन्हे नोंदविण्यात आले. क्षेत्रीय पातळीवर चौकशी पूर्ण करून ही प्रकरणे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), साकोली यांच्याकडे अतिक्रमण निष्कासनाच्या आदेशासाठी सादर करण्यात आली होती. प्राधिकृत अधिकाºयांकडून आदेश प्राप्त होताच वनविभागाने नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. दिनांक १० जुलै २०२६ रोजी नियतक्षेत्र मुरमाडी/तूप अंतर्गत मौजा भुगाव-मेंढा येथील गट क्रमांक ३४३ नवीन राखीव वन क्षेत्रात किशोर चंद्रशेखर चौबे, हरीदास लहानू दोनोडे व भारत विठोबा ठाकरे यांनी केलेले ०.४७ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईनंतर सदर वनक्षेत्र पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

याशिवाय, मौजा सोनपुरी येथील संरक्षित वन गट क्रमांक ७० मध्ये ऋषी रामटेके व प्रदीप पळसपाणी यांनी केलेले ०.४० हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण तसेच मौजा पोहरा येथील झुडपी जंगल गट क्रमांक ५३४/२ मध्ये मुकेश डोलीराम मते यांनी केलेले ०.१५ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणदेखील निष्कासित करण्यात आले. त्यामुळे लाखनी वनक्षेत्रातील संबंधित सर्व ठिकाणे पुन्हा वनविभागाच्या ताब्यात आली आहेत. सदर कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन), साकोली यांच्या निदेर्शानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. धनविजय व त्यांच्या अधिनस्त वनकर्मचाºयांनी यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम, १९२७ नुसार वनअपराध असून, कुठेही वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी नजीकच्या वनकर्मचाºयांना अथवा ‘हॅलो फॉरेस्ट’ च्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी आणि वनसंवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भंडारा वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *