तुमसर तालुक्यातील माडगी येथील ‘मातोश्री पांदण रस्ता’ कामात मोठा डोलारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील मौजा माडगी येथे ‘मातोश्री पांदण रस्ता’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमतता होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मजुरांना रोजगार देण्याऐवजी यंत्रसामग्रीचा सर्रास वापर केला जात असून, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत उप कार्यकारी अभियंता प्रफुल्ल झाडे (सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद उपविभाग, तुमसर) यांच्याकडे रीतसर तक्रार मंगळवारी दाखल करण्यात आली.

सदर माहितीनुसार, माडगी येथील विकास भोयर यांच्या घरापासून ते श्यामजी कांबळे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. ‘मनरेगा’च्या नियमांनुसार ग्रामीण भागातील मजुरांना हाताला काम मिळणे बंधनकारक असताना, या ठिकाणी मजुरांना डावलून जेसीबी व इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, अधिकाºयांच्या मर्जीतील बोगस मजूर दाखवून, केवळ त्यांचे कामाच्या ठिकाणी फोटो काढले जातात आणि त्यांना घरी पाठवले जाते, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी तक्रारीत केलाआहे. यामुळे स्थानिक व गरजू मजूर रोजगारापासून वंचित राहिले आहेत. याबाबत स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, बालचंद बोंद्रे, विठ्ठल डायरे, मुकेश कांबळे यांनी बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रफुल्ल झाडे यांना निवेदन देण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *