भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नामांतरण करण्यात यावे, या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टपासून प्रस्तावित केलेले बेमुदत आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. भंडारा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रविंद्र गणवीर, शासकीय आयटीआय तुमसरचे प्राचार्य केतन सोनपीपरे व शिल्पनिदेशक संजय लोहे यांनी आंदोलकांशी घडवून आणलेल्या सकारात्मक चचेर्नंतर आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मध्यस्थीने हा मार्ग निघाला. नामांतरणाचा शासन निर्णय त्वरित जारी व्हावा यासाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी १५ आॅगस्टपासून आयटीआय प्रांगणात बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून आंदोलकांना चचेर्साठी पाचारण करण्यात आले. आयटीआय प्राचार्य व जिल्हा अधिकारी रविंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रामुख्यानेउपस्थित राहून प्रशासन व आंदोलकांमध्ये समन्वय साधला. नामांतरणाचा प्रस्ताव शासन स्तरावर आणि संबंधित समितीकडे विचाराधीन असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. माजी आमदार चरण वाघमारे यांच्या शिष्टाईमुळे आणि आयटीआय प्राचार्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी नियोजित उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, येत्या एक महिन्याच्याआत नामांतरणाबाबत शासन स्तर- ावरून सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम यांनी दिला आहे. या बैठकीस व प्रसंगी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मनोज चौबे, सलमान पठाण, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बालचंद बोंद्रे, पत्रकार मोहन भोयर, विजय भुरे, पोलीस विभागाचे गिरीश पडोळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.