
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर उपविभागात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाºयांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी ट्रक चालक व मालक फरार आहेत. ९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १.३० ते २.३० वाजताच्या दरम्यान, मौजा खापा येथे ही कारवाई करण्यात आली. जिल्हा गस्त व उपविभागीय गस्त दरम्यान पेट्रोलिंग करत असताना, पो.स्टे. तुमसरचे पो.हवा. टेकाडे यांना तिरोडा इथून तुमसरकडे एका आयशर ट्रकमधून अवैधरित्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी त्यांच्या पथकासह नाकाबंदी केली.
नाकाबंदी पाहताच संबंधित आयशर ट्रक चालकाने ट्रक रस्त्यावर उभा करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पाठलाग करूनही तो मिळून आला नाही. पंचासमक्ष पाहणीत टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम २४६८ मध्ये २७ गोवंशीय बैल निर्दयतेने कोंबून वाहतूक केल्याचे आढळून आले. पोलीसांनी घटनास्थळावरून १६ लाल रंगाचे बैल (प्रत्येकी १५,०००,६ पांढºया रंगाचे बैल (प्रत्येकी १५,०००) ९०,०००, व ५ काळ्या रंगाचे बैल (प्रत्येकी १०,०००) ५०,०००, असा एकूण २७ बैलांची किंमत ३,८०,०००, तसेच आयशर ट्रक अंदाजे १०,००,००० असा एकूण १३,८०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम ११(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रक चालक व मालकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व सहा. पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर येथील पो.उपनि. पुरुषोत्तम राठोड यांनी केली.