अज्ञात वाहनाच्या धडकेत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू; चालक फरार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-तुमसर मार्गावरील इंदिरा टोली, सरांडी येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साहिल कमल उके (वय ११ वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. तो घराकडे खाऊचे पॉकेट घेऊन परत येत असताना ही दुर्घटना घडली. तिरोडाकडून तुमसरकडे जाणाºया पांढºया रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. सदर वेळी साहिलची आई मजुरीसाठी बाहेर गेली होती. घरी साहिलसह त्याची दोन लहान भावंडे होती. दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास साहिल घरासमोरील रस्ता ओलांडून खाऊ घेण्यासाठी गेला होता. परत येताना ही दुदैर्वी घटना घडली. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत साहिलला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ)(ब) आणि १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास उपपोलीस निरीक्षक विजय मसराम करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघात करणाºया वाहन चालकाचा तातडीने शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *