
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : उपराजधानी नागपूर येथे नुकतेच ‘काईनाईट जिम’च्या वतीने महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील तुमसर चे सुपुत्र आणि अदानी पॉवर प्लांटमध्ये कार्यरत असलेले संतोष ब्रह्मनंद बंधाटे यांनी आपल्या अचाट शक्तीचे प्रदर्शन करत ‘मास्टर्स’ आणि ‘सिनिअर’ अशा दोन्ही गटांत पदके पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने ‘बेंच प्रेस’ आणि ‘बार्बेल कर्ल’ असे दोन इव्हेंट्स ठेवण्यात आले होते. संतोष बंधाटे यांनी आपल्या खेळातील कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून १२ कसलेल्या मास्टर्स खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
यात संतोष बंधाटे यांनी बेंच प्रेसमध्ये ११० किलो आणि बार्बेल कर्लमध्ये ६० किलो, असे एकूण १७० किलो वजन उचलून रौप्य पदक आपल्या नावावर केले. तर ओपन सिनिअर गटातही त्यांनी नशीब आजमावले आणि स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवले. संतोष बंधाटे हे सध्या अदानी पॉवर प्लांटमध्ये सुरक्षा दल मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अदानी पॉवर प्लांटचे सुरक्षा प्रमुखसूर्यकांत कश्यप, हरीश ख्यानी, प्रदीप यादव आणि धीरज जोशी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. आता लक्ष्य ‘वेस्टर्न इंडिया’ स्पर्धेकडे येत्या जून महिन्यात छत्तीसगडमधील रायपूर येथे ‘वेस्टर्न इंडिया’ पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत संतोष बंधाटे हे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असून, तिथेही सुवर्णपदक पटकावण्याच्या निधार्राने त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. संतोष यांच्या या यशाबद्दल भंडारा जिल्हा बॉडी बिल्डिंग अध्यक्ष डॉ. प्रकाश सिंग, विजय गणेशे, जयंत गणेशे, सतीश बंधाटे, कमलेश दमाहे, संतोष बोहोणे, राजू बंधाटे, सत्यम नंदागवळी, योगेश कांबळे, निलेश काटकर, अॅड. प्रमोद इलमे, मनोज शेंडे, डॉ. सुनील कापगते, संजय मते, अरविंद थोटे, सचिन मेश्राम, अतुल रोडगे आणि इतर सहकाºयांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.