
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कामे करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी सर्व विभागाच्या अंमलबजावणी यंत्रणांनी त्यांचे प्रस्ताव निर्धारित वेळेत सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिड्डे व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सन २०२६-२७ या वषार्तील दिनांक ३० एप्रिल २०२६ अखेरपर्यंत मासिक प्रगती अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ साठी मंजूर निधीबाबत संबंधित अंमलबजावणी यंत्रणांना कळविण्यात आले असून, प्रस्तावित कामांची यादी दिनांक २५ मे २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
सदर यादीस आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणाºया कामांची गुणवत्ता उच्च दर्जाची राखण्याचे निर्देशही देण्यात आले. यावर्षीचे सर्व प्रस्ताव वकऊ नंबर ॠील्ली१ं३ी करुनच प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले. गेल्यावर्षीच्या खर्चाच्या बाबतीत अनुपालन अहवालाची प्रत लवकरात लवकर नियोजन विभागाकडे पाठविण्यात यावे. नवीन कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करताना सविस्तर अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आदेश, संबंधित योजनेत समावेश असल्याचे प्रमाणपत्र, दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिड्डे यांनी केले.