भंडाºयात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे निषेध आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशात वाढत असलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल भंडारा जिल्ह्याच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लव्ह जिहाद, जबरदस्ती धर्मांतर, तसेच महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अलीकडे काही ठिकाणी महिलांच्या फसवणूक, जबरदस्ती संबंध प्रस्थापित करणे, तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी कायदे करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे लागू करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरावर, जिल्हा मंत्री डॉ. राकेश सेलोकर, सहमंत्री क्रिष्णा हत्तीमारे, विभाग मंत्री प्रकाश पांडे, जिल्हा संयोजक प्रतिक कहू, सहसंयोजक आकाश रहांगडाले, तसेच पंकज भिवगडे, अथर्व नीनावे, आदीत्य ऊर- कुडे, संजय एकापुरे, मयूर बिसेन, विकास मदनकर, विनय सोलंकी, कृष्णा पांडे, अनुप ढोके, मनीष बिछवे, प्रदीप ढबाले, नितीन गायधने, शशी वैद्य, सागर कनोजे , दीपाताई नायर, प्रीती जांभूळकर, ममता दलाल, प्रीती पांडे, जया हिंगणे, सुषमा कुकडकर, मनीषा भुते, मधुरा मदनकर, चंद्रकला भोपे, प्रतिमा क्षीरसागर यांसह मातृशक्ती व दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *