वर्षा लांजेवारची उच्च न्यायालयात धाव!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्रा.पं. वडेगांव अंतर्गत येणाºया वॉर्ड क्र. ३ म्हणजेच ‘शंकरपुर’ येथील मिनी अंगणवाडी केंद्रातील मदतनीस पदभरती प्रकरणी स्थानिक उमेदवाराच्या अटीवरून शंकरपुर ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिलेल्या विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश अमान्य असल्याने वडेगांव येथील उमेदवार वर्षा लांजेवार यांनी आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व शंकरपुर ग्रामस्थांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय – नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली आहे.

२ एप्रिल २०२५ रोजी शंकरपुर ग्रामस्थांच्या आक्षेपाची सुनावणी घेत प्रकल्प अधिकारीयोगिता परसमोडे यांनी शंकरपुरच्या स्थानिक उमेदवारांना डावलून वडेगांव येथील उमेदवार वर्षा लांजेवार यांची नियुक्ती केली होती. मात्र; २४ जुलै २०२५ रोजी शंकरपुर ग्रामस्थांच्या आक्षेपाची सुनावणी घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी भरतीप्रक्रिया योग्यरित्या पार न पडल्याने नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश साकोली बाल प्रकल्पातील अधिकाºयांना दिले होते. जिल्हा कार्यक्रम अधिकाºयांचे आदेश मान्य नसल्याने वर्षा लांजेवार यांनी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कडे याचिका दाखल केली होती. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणी दरम्यान देखील त्यांनी वर्षा लांजेवार यांची याचिका फेटाळून मुख्य कार्यक्रम अधिकाºयांचे आदेश कायम केले होते. मात्र; सलग दोन पराभवानंतर देखील वर्षा लांजेवार यांनी मुंबई उच्च न्यायालय – नागपूर खंडपीठ येथे तीन मोठ्या यंत्रणेच्या विरोधात याचिका दाखल केल्याने संपूर्ण विदर्भाचे लक्ष या निकालाक- डे लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *