
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राजेंगाव आणि मुरमाडी या दोनच ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते आणि आता ते सुद्धा बंद आहेत अशा परिस्थितीत शेतकरी मका खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा करत आहेत. अनेक शेतकºयांनी मका कापणी करून ठेवला आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे हा माल घरात किंवा शेतात उघड्यावर पडून आहे. आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता असल्याने, हा मका ओला होऊन खराब होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी यामुळे आणखीनच आर्थिक अडचणीत सापडू शकतो. “शेतकºयांनी घाम गाळून पिकवलेला मका पावसाच्या पाण्यात वाया जाऊ नये, ही आमची प्रमुख भूमिका आहे. जर प्रशासनाने तात्काळ मका खरेदीसुरू केली नाही, तर शेतकºयांना पिकाचा योग्य भाव मिळणार नाही आणि त्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदारांनी लोकभावना आणि शेतकºयांची अडचण लक्षात घेता, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मका खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.