कायद्याच्या फलकाखालीच खºर्याच्या पिचकाºया!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक संतापजनक आणि विदारक चित्र समोर आले आहे. रुग्णालयात आरोग्याचे रक्षण होण्याऐवजी बेजबाबदार नागरिकांमुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयात येणारे लोक नियमांची पायमल्ली करत ठिकठिकाणी गुटखा आणि खºयाच्या पिचकाºया मारून भिंती विद्रूप करत आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाने केवळ दंडाचे फलक लावून आपले कर्तव्य संपवले असून, प्रत्यक्ष कारवाई शून्य असल्याने या समस्येने उग्र रूप धारण केले आहे.भंडारा जिल्हा रुग्णालयात “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, भंडारा” अंतर्गत उडळढअ कायदा २००३ आणि ‘अँटी स्पिटिंग अ‍ॅक्ट १९८७’ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १,००० रुपये दंडाची तरतूद असल्याचा फलक अत्यंत ठळकपणे लावण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या कायद्याच्या फलकाच्या अगदी खाली आणि केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘ई-संजीवनी’योजनेच्या भिंतीवरील माहिती पत्रकावरच नागरिकांनी खºर्याच्या आणि गुटख्याच्या पिचकार्या मारून भिंती विद्रूप केल्या आहेत. ज्या भिंतीवरून नागरिकांना आरोग्याचा संदेश मिळायला हवा, तीच भिंत आता आजार पसरवणारे केंद्र बनत चालली आहे.केवळ फलक लावून रुग्णालये स्वच्छ राहत नसतात, त्यासाठी प्रशासनाचा कडक धाक आणि प्रत्यक्ष जागेवर दंड वसूल करण्याची यंत्रणा हवी. प्रवेशद्वारावरच तंबाखू, खरा, गुटखा यांची कडक तपासणी होणे गरजेचे आहे. भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक या बेजबाबदार नागरिकांवर आणि सुस्त सुरक्षा यंत्रणेवर कधी कारवाई करणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *