डॉ.दीपचंद सोयाम यांचेकडून जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यावर भर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान आणि राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रमांतर्गत कार्यान्वित आरोग्य संस्थाद्वारे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना गुणात्मक व परिणामकारक स्वरुपात आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रम व योजनांची प्रभावी व अधिक व्यापक स्वरुपात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रनिहाय “समन्वय अधिकारी” यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आसुन, भंडारा जिल्हा आरोग्य विभागाचे समन्वय अधिकारी म्हणुन डॉ. दिपचंद सोयाम उपसंचालक, आरोग्य सेवा (रूग्णालये ),मुंबई यांची नियुक्ती करण्यात आलेली असुन, भंडारा जिल्ह्यातील दिनांक १ जून रोजी विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या सदर भेटी दरम्यान खालील नमुद बाबींचे निरिक्षण करण्यात आले ग्रामीण व नागरी आरोग्य संस्थाद्वारे पुरविण्यात येणा-या आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेणे व आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे. ग्रामीण व नागरी आरोग्य संस्था पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ, औषधी, प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, वैद्यकीय व उपभोग्य साधन सामुग्रींची उपलब्धता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे. आरोग्य संस्थास्तर, रुग्णालयस्तर, तालुकास्तर व ग्राम / प्रभागस्तर याकरिता विविध समित्यांचे गठन / पुनर्गठन तातडीने करणे. तसेच ढउढठऊळ समित्यांच्या बैठका नियमित होतील यादृष्टीने खात्री करणे. सदर समित्यांचे कामकाज प्रभावी होण्याचे दृष्टीने समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करणे व प्रशिक्षण देणे यासाठी पाठपुरावा करणे.

नवनिर्मित ग्रामीण व नागरी आरोग्य संस्थांचे बांधकाम विहीत कालावधीत पुर्ण करणे, पदनिर्मिती करणे, आरोग्य संस्था कार्यान्वित करणे व त्याद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करणे यासाठी पाठपुरावा करणे. तसेच आरोग्य संस्थांचे चालू बांधकामे विहित कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे. सिकलसेल, थैलेसिमीया व क्षयरोग दुरीकरण, पॅलिओटीव्ह केअर, मेनोपॉज क्लिनिक व इतर महत्वाच्या योजना / उपक्रमांची विशेष मोहिमेद्वारे अंमलबलजावणी करयासाठी मा. डॉ. दिपचंद सोयाम उपसंचालक, आरोग्य सेवा (रूग्णालये ),मुंबई यांनी भंडारा जिल्हयातील नागरी आरोग्य केंद्र भंडारा, हिंदू हृदय सम्राट बाळासनेब ठाकरे आपला दवाखाना जाकीर हुसेन वॉर्ड भंडारा, प्रा.आ.केंद्र धारगांव, ग्रा.रू.लाखनी, उपजिल्हा रू.साकोली व विविध आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. भेटि दरम्यान औषधी उपलब्धता, मनुष्यबळ, लसीकरण, माझे गाव आरोग्य संपन्न गाव, पी.सी.पी. एन.डी. टी. व आरोग्य सांधन सामुग्रींची उपलब्धता व विविध आरोग्य आभियानांची माहिती घेउन आमलबजावनी करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर भेटिदरम्यान डॉ नितीन कापसे जिल्हा आरोग्य जि.प.भंडारा, डॉ.संदिपकुमार गजभिये जिल्हा शल्यचिकित्सक सा.रू.भंडारा, डॉ सचिन चव्हाण अति.जि.आ. अधिकारी जि.प.भंडारा, डॉ.विवेक बोदलकर वै.अधि.( रू.प्र.केंद्र भंडारा) यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *