
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरातील सर्विस रोडवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (ठऌअक) कर्मचाºयांकडून दुजाभाव केला जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही ठिकाणी कारवाई होत असताना, तर काही निवडक फेरीवाले व दुकानदारांना सूट दिली जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, सर्विस रोडवर अनेक ठिकाणी फेरीवाले व लहान दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर ठऌअक कडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई करताना सर्वांवर समान निकष लागू केले जात नसल्याचे चित्र समोर येत आहे. काहींवर कठोर कारवाई होत असताना, इतरांना जाणीवपूर्वक वगळले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कारवाईमागे संबंधित कर्मचाºयांचे संगनमत असल्याची शंका व्यक्त केली जात असून,‘पैशांच्या व्यवहारातून काहींना वाचवले जात आहे का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. सर्विस रोडवरील अतिक्रमणावर एकसमान व निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, संबंधित कर्मचाºयांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा दुजाभाव होणार नाही याची ठोस हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये आंदोलनाची चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.