
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागरीकांना घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचे सांगुन गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाºया गॅस एजंसीवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदनानुसार, भंडारा जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचे सांगुन गॅस एजंसीकडुन ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गॅस सिलेंडर मिळावा म्हणून गॅस सिलेंडर बुकींग केलेल्या ग्राहकांना दिड महिना वाट बघावी लागते. मात्र तरिसुध्दा सिलेंडर घरपोच न मिळता गॅस गोडावुनमधुन सिलेंडर आणण्याकरीता तासनतास उभे राहावे लागते ही असे विदारक चित्र सध्या दिसुन येत आहे.
गॅस सिलेंडरबाबत एजन्सीला विचारले असता ते ग्राहकांना गॅस तुटवडा असल्याचे सांगतात. तसेच सिलेंडर उपलब्ध नाही तर आम्ही काय करावे असे उलट उत्तरे देतात मात्र गॅस एजंसीमधील कर्मचाºयांच्या ओळखीच्या लोकांना बोलवून त्यांना गॅस सिलेंडर दिले जाते. याची चौकशी करणे गरजेचे आहे. गॅस सिलेंडर हे स्फोटक असल्यामुळे मोटार सायकलवर त्याची वाहतूक करता येत नाही. मात्र काही एजंट दुसºयाच्या नावाच्या पुस्तकाचे माध्यमातुन मोटरसायकलवर दोन दोनसिलेंडर घेऊन जातात. व त्याची काळ्या बाजारात वाटेल त्या किंमतीत विक्री करतात.मग नागरीकांना एक सिलेंडससाठी धावाधाव होत असतांना एजन्सी मार्फत काहींना दोन-दोन सिलेंडर कसे काय दिले जाते? याची चौकशी करून संबंधीत एजंसी संचाचलकावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाचे विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, राधेश्याम शेंडे, राहुल थोटे, जालिंदर ताडेकर, आसाराम सेलोकर तसेंच कायकर्ते उपस्थित होते.