तक्रारीला पंधरा दिवस लोटूनही पुलाच्या बांधकामाची चौकशी नाही

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर सुरू असलेले पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने या संबंधीची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुनिल मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. नरेंद्र भोंडेकर, कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग भंडारा यांच्याकडे केली आहे. तक्रारीला १५ दिवस लोटूनही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाच्या हलगर्जी अधिकाºयांनी साधी चौकशी केली नाही. यावरून हा विभाग पुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाºया ठेकेदाराला अभय देत आहे. हे स्पष्ट दिसत आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २ आशियाई विकास बँक ( ए डी बी) टप्पा – २ अर्थसहाय्य अंतर्गत राज्य मार्ग ३५५ दहेगाव ते रोहणा तालुका सीमा रस्त्यावर सा. क्र. ३/६०० मध्ये रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून प्रशासकीय मान्यता ५ कोटी ९६ लक्ष ७२ हजार रुपयाची आहे. तर निविदा रक्कम ३ कोटी १६ लक्ष ७२ हजार रुपये आहे. निविदे मध्ये हे काम वेदांत कन्स्ट्रक्षन भंडारा यांना मिळाले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चार वेळा या पुलाची दुरुस्ती केली. त्यावर करोडो रुपये खर्च केले. मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा पूल वाहून जायचा. आता या पुलाचे नव्याने बांधकाम होणार आहे. मात्र हे काम “बिलो” मध्ये असल्याने ठेकेदार या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे करीत आहे. सध्या पुलाचे काम सुरू असून कंत्राटदार आपल्या कमाईसाठी अल्प प्रमाणात लोहा, कमी कीमतीचा सिमेंट, माती मिश्रित काळी वाळू, धूळ, चूरी मिश्रित गिट्टी वापरून बांधकाम केल्या जात आहे. २० की.मी. अंतरावरून काँक्रिट (मसाला) तयार करून कामाच्या ठिकाणी आणला जात आहे. खोदकाम झालेल्यासीएमजीएसवाय विभाग झोपेत ठिकाणी लोहयाचे बांधकाम न करता बाहेरून लोह्याचे पिंजरे तयार करून ते वापरले जात आहेत. अपुºया खोदकामामुळे कामाला गती नसल्याचे दिसून येत आहे.

अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता आपल्या मनमर्जीने निकृष्ठ दर्जाचे काम ठेकेदाराकडून केल्या जात आहे. पाण्यामध्येच कॉकरेंटिगचे काम केल्या जात असून कामाच्या ठिकाणी बांधकामाच्या अंदाजपत्रकाचे फलक लावण्यात आलेले नाही. पुलाच्या कामावर अडाणी, वयोवृद्ध, कमी वयाचे, अशिक्षित ज्यांचा विमा काढलेला नाही अशा मजुरांची, दिवांजीची निवड करून त्यांच्या हाताने ओबड – धोबड काम केल्या जात आहे. पुलाच्या पायव्याचेच काम मजबूत होत नसल्याने पुलाचे काम मजबूत होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निकृष्ट होत असलेल्या कामा बद्दल तेथील सुपरवायझरला हटकले असता त्याने “एका लोकप्रतिनिधीला मोठी रक्कम द्यावी लागली असल्याने काम मजबूत कसे होईल” असे सांगितले. यावरून बांधकामात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित विभागाचा कोणताही कर्मचारी सदर कामावर उपस्थित राहत नसल्याने ठेकेदाराला बांधकामात भ्रष्टाचार करण्यास रान मोकळे झाले आहे.

शासन नागरिकांना जाण्या, येण्याची सोय व्हावी म्हणून दरवर्षी पूल बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करते, मात्र ज्यांच्याकडे हा पैसा खर्च करण्यासाठी येते तेच अधिकारी ठेकेदारांना हाताशी धरून बोगस कामे करून अर्धाअधिक पैसा आपल्या घशात घालतात. त्यामुळे जिकडे – तिकडे बोगस कामे होत आहेत. रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पुलाचे बोगस बांधकाम करणाºया ठेकेदाराचा परवाना रद्द करून सदर कामाचे देयके थांबविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. नरेंद्र भोंडेकर, कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग भंडारा यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. या तक्रारीला १५ दिवस लोटूनही संबंधित विभागाच्या हलगर्जी अधिकाºयांनी साधी चौकशीही केली नाही. यावरून असे स्पष्ट होते की पुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार करण्यास संबंधित विभागाचा ठेकेदाराला पाठबळ आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *