साकोलीत अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेचा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिची गर्भधारणा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी वैभव धांडे (वय २१, रा. कळमना, नागपूर) याच्याविरुद्ध पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून साकोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची मैत्रीण आपल्या पतीसोबत नागपूर येथील कळमना परिसरात राहत होती. मैत्रीच्या नात्यामुळे पीडित मुलीचे त्या कुटुंबाकडे नियमित येणे-जाणे होते. याच दरम्यान आरोपी वैभव धांडे याच्यासोबत तिची ओळख वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले. या संबंधातून दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, ज्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने साकोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोक्सो व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *