गळफास लावून एका इसमाची आत्महत्या मृतदेह आढळून आले कुजलेल्या अवस्थेत

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा-तील पवनारखारी जंगलात एका झाडाला लटकलेले प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटना ३० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. राजकुमार लेखू नेवारे (३८) रा. आष्टी असे मृतकाचे नाव असून १७ मार्चपासून बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

तुमसर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी राजकुमार लेखचंद नेवारे (वय ३८ वर्ष) हा व्यक्ती १७ मार्च पासून घरुन बेपत्ता झालेला होता, माहितीनुसार मृत व्यक्ती विवाहित असून त्याला पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे आणि तो स्वत: मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे, फाशी लावलेल्या अवस्थेत आज सकाळी ९ वाजे नाकाडोंगरी येथील गुराखी गायी चरण्यासाठी जंगलात गेले असता त्याला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आणि मृतदेह नाकाडोंगरी गावाजवळ पवणारखारी जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत दिसून आले, असे दिसताच गुराखी गावात येऊन घटनेची माहिती दिली, गावकºयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोबरवाही पोलीस घटनास्थळी येऊन मर्ग दाखल करून मृत्यूदेहाचे पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय तुमसर येथे पाठविले. पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *