
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यात अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत देशी दारूची चोरटी वाहतूक करणाºया मोटारसायकलला रंगेहात पकडले विरली (बुद्रुक) मार्गावर रचलेल्या सापळ्यात ही कारवाई पार पडली असून परिसरात खळबळ उडाली आहे . गुप्त माहितीच्या आधारे लाखांदूर पोलीस स्टेशनच्या पथकाने नाकाबंदी केली होती . संशयास्पद मोटरसायकल थांबून झडती घेतली असता . वाहना देशी दारूचे तब्बल ४० टिल्लू आढळून आले . पोलिसांनी तात्काळ दारू साठा जप्त करत आरोपीला ताब्यात घेतली . या कारवाईत अंदाजे ९० हजार रुपये किमतीची मोटर सायकल व सुमारे चार हजार रुपयांच्या दारूसाठा असा एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी नरेश गभने (वय ४५) राह. धामनी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली .