१२ गावातील नागरीकांचे पुनर्वसन करून योग्य मोबदला द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : उमरेड-पवनी-कारांडला अभयारण्याच्या पवनी तालुक्यातील १२ गावांचे पुनर्वसन व मोबदला मिळाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या कृती समितीने सोमवारपासून विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी व्याघ्र प्रकल्प कार्यालय पवनी समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उमरेड-पवनी-कारांडला व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी पवनी तालुक्यातील काहीअंशी जंगल भागाचा समावेश करण्यात आला. यात अनेक गावे व शेतजमीनी बाधित झाल्यात.

यामध्ये पीडित झालेल्या गावांचे पुनर्वसन झाले असले तरी १२ गावांचा प्रश्न कायम आहे. सदर गावांचे पुनर्वसन व शेतजमिनीचे अधिग्रहण करण्याची अधिसूचना जाहीर करून बराच कालावधी लोटला आहे मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सदर प्रश्न ऐरणीवर आहे. आधीच हिंस्त्र पशूंच्या भितीमुळे या परिसरातील जनता भयभीत झाली आहे. दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी शेती व शेतमजुरीवर अवलंबून असणारी येथील जनता जीवन मरणाच्या भीतीने पुरती घायाळ झाली आहे. असे असतांना शासन-प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेण्यात आनंद मानते का? असा प्रश्न जनतेनी उपस्थित केला आहे. अनेक दिवसांपासून आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने उमरेड-पवनी-कारांडला अभयारण्य अन्यायग्रस्त कृती समितीने सोमवारपासून वन्यजीव कार्यालयापुढे साखळी उपोषण सुरू केले आहे. समितीचे संयोजक अनिल मेंढे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनात बबलू वाघमारे, हरीशतलमले, अरविंद आसई, महेश गोन्नाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण स्थळाला पवनीच्या नगराध्यक्ष डॉ. विजया राजेश नंदूरकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *